ग्राहकांच्या तक्रारींची दखल; साठा, वजन व वितरण नोंदींची पाहणी तळोद्यात गॅस एजन्सीची तपासणी; गॅस वितरण सुरळीत करण्याच्या सूचना गोमातेच्या अंत्यविधीसाठी धावले युवा क्रांती फाउंडेशनचे कार्यकर्ते! मायेने भरलेला कळस म्हणजे आई! मायेचा विसावा देणारी सावली म्हणजे आई! नंदुरबार येथे कमलबाई मराठे यांच्या शतकपूर्ती निमित्त एक दिवशीय शिबिर संपन्न कमलबाई शामराव मराठे यांचा “शतकपूर्ती” सोहळा निमित्त परिवर्तन चळवळ पदाधिकारी यांचे एक दिवसीय शिबीर बेमोसमी वादळी पावसाचा तडाखा; मालदा येथे कापणीला आलेल्या पिकाना फटका, पत्रे उडाले, झाडे उन्मळली. तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गाळ्यांचे भूमिपूजन संपन्न!सभापती तथा आमदार राजेश पाडवी व उपसभापती अमोल भारती यांच्या शुभहस्ते भूमिपूजन

गोमातेच्या अंत्यविधीसाठी धावले युवा क्रांती फाउंडेशनचे कार्यकर्ते!

तळोदा :(हेमंत मराठे तालुका प्रतिनिधी मो.9689840855)सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवेचा वसा घेतलेल्या युवा क्रांती फाउंडेशन – पोलिसमित्र टीम महाराष्ट्र राज्याच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आपल्या सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडविले. तळोदा येथील नेमसुशील शाळेच्या मागे असलेल्या तबेल्याचे मालक पोखराम सोनाजी चौधरी यांच्या गोमातेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच फाउंडेशनचे कार्यकर्ते मदतीसाठी तत्काळ धावून गेले. यावेळी विनोद भाऊ चौधरी आणि हरीश भाऊ पाटील यांनी उपस्थित राहून गोमातेच्या अंत्यविधीसाठी सहकार्य केले.


युवा क्रांती फाउंडेशनचे कार्यकर्ते केवळ एखाद्या विशिष्ट कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय असतात. गोसेवा, गणेशोत्सवातील बंदोबस्त, नवरात्रोत्सवातील व्यवस्था तसेच इतर सामाजिक व सार्वजनिक कार्यांमध्ये हे कार्यकर्ते नेहमीच पुढाकार घेतात. विशेष म्हणजे, अनेक प्रसंगी कोणतेही मानधन न घेता ते विनामूल्य सेवा देतात. काही वेळा सामाजिक कार्यासाठी लागणारा खर्चही स्वतःच्या खिशातून करतात.
समाजातील गरजू व्यक्तींना मदत करणे, सार्वजनिक उत्सवांमध्ये शिस्त व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करणे आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून नागरिकांच्या मदतीला धावून जाणे, ही या टीमच्या कार्याची वैशिष्ट्ये आहेत. गोमातेच्या मृत्यूची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी दाखविलेली तत्परता ही त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे उदाहरण ठरली.
आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःचा वेळ देऊन, कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता सामाजिक कार्य करणे ही कौतुकास्पद बाब आहे. समाजसेवा ही केवळ प्रसिद्धीसाठी नसून ती माणुसकी आणि कर्तव्यभावनेतून केली पाहिजे, हा संदेश युवा क्रांती फाउंडेशनच्या कार्यातून दिसून येतो.
गोसेवा आणि सामाजिक बांधिलकी जपत समाजात सहकार्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी युवा क्रांती फाउंडेशन – पोलिसमित्र टीम महाराष्ट्र राज्याचे कार्यकर्ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

error: Content is protected !!