मायेने भरलेला कळस म्हणजे आई! मायेचा विसावा देणारी सावली म्हणजे आई! नंदुरबार येथे कमलबाई मराठे यांच्या शतकपूर्ती निमित्त एक दिवशीय शिबिर संपन्न कमलबाई शामराव मराठे यांचा “शतकपूर्ती” सोहळा निमित्त परिवर्तन चळवळ पदाधिकारी यांचे एक दिवसीय शिबीर बेमोसमी वादळी पावसाचा तडाखा; मालदा येथे कापणीला आलेल्या पिकाना फटका, पत्रे उडाले, झाडे उन्मळली. तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गाळ्यांचे भूमिपूजन संपन्न!सभापती तथा आमदार राजेश पाडवी व उपसभापती अमोल भारती यांच्या शुभहस्ते भूमिपूजन महावितरनाच्या हलगर्जीपणा मुळे मोड येथील शेतकऱ्यांना लाखोचा फटका, 9 एकर ऊस जळून खाक. शहादाऔषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिवस उत्साहात.

नंदुरबार जिल्ह्यातील मराठा-कुणबी नोंदी तात्काळ प्रसिद्ध करा, अन्यथा तीव्र आंदोलन : मराठा समाज उन्नती मंडळाचा इशारा

तळोदा: (तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे मो 9689840855)दि. १९ महाराष्ट्र शासनाने मराठा समाजास OBC मधून आरक्षण देण्यासाठी नेमलेल्या न्या. शिंदे समितीला राज्यभरात ५८ लाख ८२ हजार ३६५ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार या नोंदी नगरपरिषद, नगरपंचायत, तलाठी व ग्रामसेवक कार्यालयांवर प्रसिद्ध करणे बंधनकारक असताना नंदुरबार जिल्ह्यात अद्यापही या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे हजारो मराठा बांधव कुणबी प्रमाणपत्रापासून वंचित राहत असून हा प्रकार अत्यंत अक्षम्य असल्याची टीका नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाज सार्वजनिक उन्नती मंडळाने केली आहे.

या प्रकरणी मंडळाच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. येत्या ७ दिवसांत याद्या प्रसिद्ध करण्याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनात पुढीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत
नंदुरबार जिल्ह्यात शोधलेल्या मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी नोंदींची यादी तात्काळ ग्रामपातळीवर प्रसिद्ध करावी.
सर्व नोंदींची यादी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर (Website) तसेच महा-ई-सेवा व सेतू केंद्रावर मोफत उपलब्ध करून द्यावी.
गावपातळीवर वंशावळ पडताळणी, अर्ज भरणे आणि प्रमाणपत्र वाटपासाठी महसूल विभागामार्फत विशेष शिबिरांचे (Camps) आयोजन करावे.
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत तात्काळ आदेश द्यावेत.

सदर मागण्यांवर ७ दिवसांत कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल व उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही मंडळाने दिला आहे.

अशा आशयाचे निवेदन मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग महादू मराठे, उपाध्यक्ष शांतीलाल गायकवाड, सचिव अनिल वायकर, सुनील चव्हाण, ईश्वर काळे यांनी मंडळाच्या वतीने
दिले.

Leave a Comment

और पढ़ें

error: Content is protected !!