ग्राहकांच्या तक्रारींची दखल; साठा, वजन व वितरण नोंदींची पाहणी तळोद्यात गॅस एजन्सीची तपासणी; गॅस वितरण सुरळीत करण्याच्या सूचना गोमातेच्या अंत्यविधीसाठी धावले युवा क्रांती फाउंडेशनचे कार्यकर्ते! मायेने भरलेला कळस म्हणजे आई! मायेचा विसावा देणारी सावली म्हणजे आई! नंदुरबार येथे कमलबाई मराठे यांच्या शतकपूर्ती निमित्त एक दिवशीय शिबिर संपन्न कमलबाई शामराव मराठे यांचा “शतकपूर्ती” सोहळा निमित्त परिवर्तन चळवळ पदाधिकारी यांचे एक दिवसीय शिबीर बेमोसमी वादळी पावसाचा तडाखा; मालदा येथे कापणीला आलेल्या पिकाना फटका, पत्रे उडाले, झाडे उन्मळली. तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गाळ्यांचे भूमिपूजन संपन्न!सभापती तथा आमदार राजेश पाडवी व उपसभापती अमोल भारती यांच्या शुभहस्ते भूमिपूजन

ग्राहकांच्या तक्रारींची दखल; साठा, वजन व वितरण नोंदींची पाहणी तळोद्यात गॅस एजन्सीची तपासणी; गॅस वितरण सुरळीत करण्याच्या सूचना

तळोदा* : ( तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे मो.9689840855)ग्राहकांना वेळेवर गॅस सिलेंडर उपलब्ध व्हावेत आणि वितरणातील अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, तळोदा व तहसील पुरवठा विभागाच्या वतीने किरण एजन्सी येथे भेट देऊन तपासणी करण्यात आली. यावेळी ग्राहकांच्या तक्रारींचा आढावा घेऊन सिलेंडर वेळेवर मिळण्यात येणाऱ्या अडचणींबाबत चौकशी करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांत उपाध्यक्ष वंदना तोरवणे,तालुका अध्यक्ष भिका चव्हाण,उपाध्यक्ष भगवान माळी,सदस्य भरत भामरे आणि मोहन माळी यांच्यासह पुरवठा निरीक्षक द्वारका आगळे आणि पुरवठा निरीक्षक सोनाली फुलपगारे, एजन्सी चे संचालक किरण पवार आदी उपस्थित होते. सुरुवातीला ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी व पुरवठा विभागाचे अधिकारी यांची बैठक होऊन गॅस ग्राहकांना सिलेंडर उपलब्ध करून घेताना निर्माण होणाऱ्या अडचणीन बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर एजन्सीच्या गॅस साठ्याची, वितरण व्यवस्थेची आणि गोडाऊनची पाहणी केली. उपलब्ध सिलेंडरच्या साठ्यानुसारच ग्राहकांना प्रतीक्षा रांगेत थांबवावे, वितरणाची तारीख दर्शनी फलकावर लिहावी, तसेच प्राप्त साठा, वितरण आणि पावत्यांच्या नोंदी अद्ययावत ठेवून त्यासाठी स्वतंत्र नोंदवही ठेवावी, अशा सूचना देण्यात आल्या.
कुटीर रुग्णालय, आश्रमशाळा आणि इतर संस्थांना गॅस सिलेंडरचा पुरवठा नियमितपणे करावा. संबंधित संस्थांना सिलेंडर देताना सक्षम अधिकाऱ्यांचे पत्र घ्यावे, तसेच साठा संपण्यापूर्वीच पुढील गॅस सिलेंडरची गाडी मागवावी, जेणेकरून पुरवठा खंडित होऊन ग्राहकांची गैरसोय होणार नाही, असे निर्देश देण्यात आले.
गोडाऊनमधील सिलेंडरची सुरक्षित मांडणी, भिंतीपासून एक फूट अंतर ठेवण्याबाबत तसेच भरलेल्या सिलेंडरच्या वजनाची तपासणी करण्यात आली. ग्राहकांना सिलेंडर ताब्यात देताना सिलेंडर वजन काट्यावर मोजून द्यावा व काही तांत्रिक अडचणी आढळल्याने त्याबाबत आवश्यक सूचनाही देण्यात आल्या.


*तळोदा शहरासाठी नवीन एजन्सीची गरज:*

तळोदा शहर व परिसरातील ४० हुन अधिक गावांसाठी एकच गॅस एजन्सी कार्यरत आहे.१७ हजार,२०० व्यावसायिक सिलेंडरचे कनेक्शन तळोदा शहरातील एकाच एजन्सीवर जोडण्यात आले आहेत त्यामुळे सदर एजन्सीवर मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या भार येत असून सिलेंडरचे वितरण करताना देखील अडचणी निर्माण होतात यामुळे उपलब्ध होणारे सिलेंडर व सिलेंडरची असणारी मागणी यात मोठा तुटवडा निर्माण होऊन अनेक ग्राहकांना वेळेवर गॅस उपलब्ध होत नाही ही समस्या लक्षात घेता एकाच एजन्सी वरील ग्राहकांची वाढत जाणारी संख्या व भविष्यात निर्माण होणारी समस्या यामुळे तळोदा शहरात नवीन एका गॅस एजन्सीची आवश्यकता असून त्या दृष्टीने योग्य कार्यवाही होणे गरजेचे आहे.

ग्राहकांच्या समस्यांच्या आढावा घेतला व गॅस वितरणातील अडचणी जाणून घेतल्या.प्रत्यक्ष गोडाऊन व उपलब्ध साठ्याची पाहणी केली. यावेळी उपस्थित ग्राहक पंचायतींच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. गॅस वितरणाबाबत नागरिकांना समस्या निर्माण होणे यासाठी एजन्सीला सूचना देण्यात आल्या.

द्वारका आगळे,पुरवठा निरीक्षक तहसील कार्यालय
तळोदा.

Leave a Comment

और पढ़ें

error: Content is protected !!