
तळोदा : (तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे मो.9689840855) नंदुरबार येथे नुकतेच पार पडलेल्या कमलबाई मराठे यांचा शतकपूर्ती सोहळा मोठ्या थाटामाटात विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मराठा समाजाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचे उपस्थितीत पार पडला. नंदुरबार येथे शिवशक्ती मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमानिमित्त मराठा समाज परिवर्तन चळवळीचे कार्यकर्त्यांचे व पदाधिकाऱ्यांचे एक दिवसाचे शिबीरही घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर बी.एस .पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार डॉक्टर हिना गावित राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा माधवीताई पाटील, विक्रीकर आयुक्त राजेश जी जाधव, सहाय्यक आयुक्त अभिजीत बाविस्कर, चाळीसगाव येथील उद्योजक आनंदराव चौथे शहादा येथील प्रसिद्ध उद्योजक श्याम भाऊ जाधव सुरत महानगरपालिकेचे नगरसेवक तथा समाजसेवक सोमनाथ भाई मराठे, राऊ मोरे, मनोज पवार, ईश्वर भाई पवार ,रवींद्र पवार ,भास्कर कदमबांडे डॉ. चंद्रभान कदम दीपक काळे, धनराज घेवारे ,टिनू आप्पा मराठे, शैलेंद्र इंगळे, डॉक्टर तेजल चौधरी, संभाजी पाटील, सागर मराठे, योगेश मराठे ,किरण काळे ,रवींद्र इंगळे, बाबा मराठे, अर्जुन मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात प्रामुख्याने पालकांची शैक्षणिक भूमिका, स्पर्धा परीक्षांची तयारी आनंदी जीवनशैली आणि एकत्र कुटुंब पद्धती या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आलेल्या मान्यवरांनी विविध विषयांवर ती आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी शिबिरात लकी ड्रॉ द्वारे 25 भाग्यवंतांना कमलबाई मराठे यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तळोदा येथील धनराज मराठे सर व चेतन पाटील यांनी केले. आयोजनासाठी विविध मराठा समाज संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
*आनंदी जीवन जगण्याचे रहस्य!*
मराठा समाज परिवर्तन चळवळीचे मुख्य समन्वयक विठ्ठल मराठे सर यांनी आलेल्या सर्व समाज बांधवांना संबोधित करताना म्हटले की, आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मक विचार ठेवणे आवश्यक आहे आणि जीवनात आनंद घ्यायचे असेल तर दैनंदिन कामकाजा सोबतच इतर समाज उपयोगी गोष्टी करून समाज कसा पुढे जाईल याच्या दृष्टिकोन ठेवला पाहिजे व आपण इतर समाज बांधवांना जो आनंद देऊ त्याच्यात जो आनंद असतो तो कुठल्याही गोष्टीत नाही. हेच खरे आनंदी जीवनाचे सूत्र आहे.

*विविध क्षेत्रातील योगदान देणाऱ्यांच्या केला सन्मान*
कृषी शिक्षण आरोग्य आणि पत्रकारितेसह विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या डॉक्टर चंद्रभान कदम ,संजय बोराणे, प्राध्यापक डॉक्टर रवींद्र कदम, योगेश राजपूत, रवींद्र पाटील, शामकांत सोमवंशी, हेमंत उगले, रवींद्र पेटकर, भरत दाभाडे, प्रवीण पाटील, सुरेश साळुंखे, संजय मिरगे,संजय नवले, युवराज मिरगे, जगन्नाथ घुले, गिरधर पवार, किशोर साळुंखे, आणि भानुदास मिरगे यांच्या सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडल्यावर शेवटी मराठा समाज परिवर्तन चळवळीचे सर्व कार्यकर्त्यांनी कमलबाई मराठे यांचा पुष्पगुच्छ टाकून यथोचित निरोगी आयुष्याची कामना करत सदिच्छा दिल्या.










