मायेने भरलेला कळस म्हणजे आई! मायेचा विसावा देणारी सावली म्हणजे आई! नंदुरबार येथे कमलबाई मराठे यांच्या शतकपूर्ती निमित्त एक दिवशीय शिबिर संपन्न कमलबाई शामराव मराठे यांचा “शतकपूर्ती” सोहळा निमित्त परिवर्तन चळवळ पदाधिकारी यांचे एक दिवसीय शिबीर बेमोसमी वादळी पावसाचा तडाखा; मालदा येथे कापणीला आलेल्या पिकाना फटका, पत्रे उडाले, झाडे उन्मळली. तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गाळ्यांचे भूमिपूजन संपन्न!सभापती तथा आमदार राजेश पाडवी व उपसभापती अमोल भारती यांच्या शुभहस्ते भूमिपूजन महावितरनाच्या हलगर्जीपणा मुळे मोड येथील शेतकऱ्यांना लाखोचा फटका, 9 एकर ऊस जळून खाक. शहादाऔषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिवस उत्साहात.

कमलबाई शामराव मराठे यांचा “शतकपूर्ती” सोहळा निमित्त परिवर्तन चळवळ पदाधिकारी यांचे एक दिवसीय शिबीर

तळोदा: (तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे मो.9689840855)राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृपेने आणि जेष्ठाचे आशिर्वाद आणि आपणा सर्वांच्या प्रेमामुळे प्रेमळ, कर्तृत्ववान व संस्कारमूर्ती आईसाहेब गं.भा.कमलबाई शामराव मराठे (आव्हाळे) यांनी जीवनातील १०१ वर्ष अमूल्य असा प्रवास करत असताना त्यांचा शतकपूर्ती सोहळा तसेच परिवर्तन चळवळीच्या पदाधिकाऱ्यांचे एक दिवसीय शिबीर दि.१८ ऑक्टोबर २०२६ रोजी रविवारी सकाळी ९ वाजता शिवशक्ती मंगल कार्यलय, गुरुकुल नगर, लिंबाई भवन, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आले आहे.
आई म्हणजे मायेचा अथांग सागर, त्याग, प्रेम, संस्कार आणि कुटूंब एकत्र ठेवणारे पवित्र व्यक्तिमत्व. त्यांच्या शतायुषी जीवन प्रवासातील अनुभव, संघर्ष, कष्ट आणि प्रेम आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी राहिले आहेत. या अविस्मरणीय आणि आनंददायी क्षणाचे औचित्य साधून त्यांच्या शतकपूर्ती निमित्त युवकांसाठी व युवतींसाठी आणि चळवळीतील सर्व पदाधिकारी, आपली प्रामाणिक बॅक सर्व सदस्य तसेच १०१ तरुण जोडप्यांचे एक दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात आत्मविश्वास आणि उत्तम आरोग्य हे यशस्वी जीवनाचे दोन महत्वाचे आधारस्तंभ आहेत. आजचा युवक माहिती तंत्रज्ञानाने समृद्ध आहे. इंटरनेट, सामाजिक माध्यमे, आधुनिक शिक्षण पध्दती यामुळे त्याच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारल्या आहेत. मात्र मानसिक ताण, स्पर्धा, बेरोजगारी आणि मूल्यांचा र्‍हास अशा समस्या युवकांच्या जीवनात वाढताना दिसतात.
शिक्षण घेऊनही योग्य नोकरी न मिळणे ही मोठी समस्या आहे. मर्यादित संधी आणि वाढती स्पर्धा युवकांना नैरास्याकडे ढकलते, अपेक्षेचे ओझे, अपयशाची भीती आणि भविष्याची चिंता यामुळे युवकांमध्ये तणाव वाढत आहे. तसेच समाज बांधवांसाठी जबाबदारी पार पाडतांना ताण-तणाव निर्माण होणे व मंडळ पदाधिकारी म्हणून कार्य करतांना येणारा ताण-तणाव मोबाईल आणि इंटरनेटचे व्यसन युवकांच्या व समाज बांधवांच्या आरोग्यावर आणि करिअरवर परिणाम करत आहेत. आभासी जगात रमल्यामुळे प्रत्यक्ष नातेसंबंध, अभ्यास व समाज बांधवांच्या आणि शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष होते. आजचा युवक प्रचंड क्षमतेचा आहे. मात्र त्याच्या प्रगतीचा मार्गात अनेक अडथळे आहेत. शिक्षण, रोजगार, कौशल्य, मानसिक आरोग्य आणि नैतिक मूल्य या सर्वच क्षेत्रात संतुलन राखणे ही काळाची गरज आहे. युवकांनी सकारात्मक विचारसरणी, कष्ट, चिकाटी आणि आत्मविश्वास यांचा आधार घ्यावा. युवकांनी आव्हानांना संधी मानून पुढे वाटचाल केल्यास स्वतःचे व कुटुंबाचे तसेच समाजाचे भविष्य निश्चितच उज्वल होईल. याच पध्दतीने आजच्या धकाधकीच्या जीवनात ताण तणाव, चिंता, अस्वस्थता या समस्या सर्व सामान्य झाल्या आहेत.
त्यामुळे मधुमेह, सांधेदुःखी, उच्च रक्तदाब, पाठदुखी, हृदयविकार, चिंता, दमा, नैराश्य (नाराज असणे), कर्करोग (कॅन्सर), निद्रानाश (झोप न लागणे) अशा आजारांची सुरूवात होत असते. अशा परिस्थितीत मानसिक शांतता, समकारात्मक विचार आणि आनंदी जीवन शैली अंगीकारणे अत्यंत आवश्यक झाले आहे. याच उद्देशाने “ताण-तणाव मुक्त जीवन व आनंदी जीवन शैली” या विषयावर एक प्रेरणादायी व मार्गदर्शनात्मक सत्र व युवकांसाठी व युवतींसाठी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व समाजातील मुलींसाठी कौशल्य विकास तसेच करिअर मार्गदर्शन अशा जीवनातील महत्वाच्या विषयांसाठी तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तरी परिवर्तन चळवळीच्या युवक, युवती, पदाधिकारी यांनी या कार्यक्रमात आवर्जुन सहभागी होऊन आपले भविष्य व आपले जीवन आनंदी, उत्साही व आत्मविश्वास तसेच समाधानासाठीचे पैलू श्रवणात येतील तरी आपली उपस्थिती हीच या उपक्रमाच्या माध्यमातून समाजाचे हित ठरू शकेल. तरी या शिबीरास उपस्थित राहण्याचे आवाहन शेती उद्योजक भटु शामराय मराठे, मराठा समाज प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष तथा नंदुरबार मराठा समाज परिवर्तन चळवळीचे मुख्य समन्वयक विठ्ठल शामराव मराठे, उपशिक्षक सागर भटु मराठे यांच्याकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

error: Content is protected !!