मायेने भरलेला कळस म्हणजे आई! मायेचा विसावा देणारी सावली म्हणजे आई! नंदुरबार येथे कमलबाई मराठे यांच्या शतकपूर्ती निमित्त एक दिवशीय शिबिर संपन्न कमलबाई शामराव मराठे यांचा “शतकपूर्ती” सोहळा निमित्त परिवर्तन चळवळ पदाधिकारी यांचे एक दिवसीय शिबीर बेमोसमी वादळी पावसाचा तडाखा; मालदा येथे कापणीला आलेल्या पिकाना फटका, पत्रे उडाले, झाडे उन्मळली. तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गाळ्यांचे भूमिपूजन संपन्न!सभापती तथा आमदार राजेश पाडवी व उपसभापती अमोल भारती यांच्या शुभहस्ते भूमिपूजन महावितरनाच्या हलगर्जीपणा मुळे मोड येथील शेतकऱ्यांना लाखोचा फटका, 9 एकर ऊस जळून खाक. शहादाऔषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिवस उत्साहात.

नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात शहीद जवानांच्या स्मृतींना वृक्षरूपी आदरांजली…..!

80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ‘एक पेड शहीद जवान के नाम’ उपक्रम उत्साहात…

नंदुरबार : 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासोबतच देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या वीर जवानांना आदरांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ‘एक पेड शहीद जवान के नाम’ हा भावपूर्ण वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

राज्यातील हरित महाराष्ट्र अभियाना अंतर्गत ‘300 कोटी वृक्ष लागवड या उपक्रमात कार्यालयाच्या आवारात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल नलावडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. देशाच्या सीमेचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांच्या स्मृती कायमस्वरूपी जपल्या जाव्यात, तसेच त्यांच्या त्यागाला अनोख्या पद्धतीने मानवंदना मिळावी, या भावनेतून वृक्षारोपण करण्यात आले. ‘एक पेड शहीद जवान के नाम’ या बोधवाक्यातून देशभक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश देण्यात आला.

या उपक्रमातून ‘शहीद जवानांच्या स्मृतींना वृक्षरूपी आदरांजली आणि पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल’ हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. वृक्षारोपणामुळे कार्यालयीन परिसरात हरित वातावरण निर्माण होण्यासोबतच पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती होण्यास मदत होणार आहे.

या वेळी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुकेश देवरे, रविंद्र शिंदे, माधुरी पालवे, गणेश देवरे, जितेंद्र देवकर, रवी बैसाणे, श्री.असमार, श्रीमती वसावे मॅडम, तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रतिनिधी उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांना अभिवादन, पर्यावरण संवर्धनाचा संकल्प आणि नागरिकांमध्ये वृक्षारोपणाची प्रेरणा, असा त्रिसूत्री संदेश देण्यात आला.

Leave a Comment

और पढ़ें

error: Content is protected !!