मायेने भरलेला कळस म्हणजे आई! मायेचा विसावा देणारी सावली म्हणजे आई! नंदुरबार येथे कमलबाई मराठे यांच्या शतकपूर्ती निमित्त एक दिवशीय शिबिर संपन्न कमलबाई शामराव मराठे यांचा “शतकपूर्ती” सोहळा निमित्त परिवर्तन चळवळ पदाधिकारी यांचे एक दिवसीय शिबीर बेमोसमी वादळी पावसाचा तडाखा; मालदा येथे कापणीला आलेल्या पिकाना फटका, पत्रे उडाले, झाडे उन्मळली. तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गाळ्यांचे भूमिपूजन संपन्न!सभापती तथा आमदार राजेश पाडवी व उपसभापती अमोल भारती यांच्या शुभहस्ते भूमिपूजन महावितरनाच्या हलगर्जीपणा मुळे मोड येथील शेतकऱ्यांना लाखोचा फटका, 9 एकर ऊस जळून खाक. शहादाऔषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिवस उत्साहात.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नंदुरबार येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त “३० कोटी वृक्ष लागवड अभियान” अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

*तळोदा* :(तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे मो.9689840855)
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार येथे दि.14 ऑगस्ट 2026 रोजी शासनाच्या 30 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपणाच्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला. उपप्रादेशिक परिवहनअधिकारी मा. जयश्री दुतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी मा. राहुल नलावडे यांच्या उपस्थितीत कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
या वृक्षारोपणाचे बोधवाक्य “एक पेड शहीद जवान के नाम” असे होते. आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या वीर जवानांना आदरांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने हे वृक्षारोपण करण्यात आले.

देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांच्या स्मृती जतन करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमास सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुकेश देवरे, रविंद्र शिंदे, माधुरी पालवे तसेच कार्यालयातील कर्मचारी. गणेश देवरे, जितेंद्र देवकर, रवी बैसाणे, असमार, श्रीमती वसावे मॅडम, तसेच कार्यालयातील कर्मचारी तसेच सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.


“शहीद जवानांच्या स्मृतींना वृक्षरूपी आदरांजली आणि पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल” या भावनेतून पार पडलेल्या या उपक्रमामुळे कार्यालयीन परिसरात हरित वातावरण निर्माण करण्यास तसेच नागरिकांमध्ये वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यास निश्चितच प्रेरणा मिळेल.असे मत सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल नलावडे यांनी उपस्थिता समोर मांडले.

Leave a Comment

और पढ़ें

error: Content is protected !!