तळोदा* : (तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे मो.9689840855)आगामी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत मुस्लिम समाजातील विविध पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
बैठकीस अमीन पिंजारी, इद्रिसअली सय्यद, नसीर खान, शे. अजीज, शाहिद सय्यद, अमानुद्दीन शेख,आदिल शेख, आरिफ शेख, निसार मकरानी, मौलाना शोएब रजा नुरी, मुश्ताक शिकलीकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

यावेळी सणाच्या काळात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली. शहरात मोठ्या आवाजात वाहने चालविणे, रेस करून वाहने चालविणे तसेच टवाळखोरांकडून होणारी छेडखानी यावर पोलिसांनी लक्ष ठेवावे, अशी मागणी करण्यात आली.
बसस्थानक परिसरात रात्रीच्या वेळी वादाचे प्रकार घडत असल्याने या परिसरात पोलिसांचे पेट्रोलिंग वाढवावे, अशी सूचना करण्यात आली. तसेच सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यासाठी नगरपालिकेशी पत्रव्यवहार करावा, तसेच बसस्थानक आवारात पोलिस चौकी उभारावी असेही बैठकीत ठरविण्यात आले. नागरिकांनी बाहेरगावी जाताना अथवा परिसर सोडताना पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले. सण शांततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले….










