
तळोदा* : ( तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे मो.9689840855) दिनांक 10/08/2026 रोजी तळोदा तालुका शिंपी समाज स्नेहवर्धिनी संस्थामार्फत नवीनच उभारलेल्या वास्तूचे सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. तदनंतर सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. तसेच ज्या देणगीदात्यांनी भवन उभारने कामी आर्थिक मदत केली होती त्यांच्या संस्थेचे अध्यक्ष सुपडू पुरुषोत्तम भांडारकर, नवयुवक अध्यक्ष रुपेश शिंपी, महिला मंडळ अध्यक्षा पूनम शिंपी, उपाध्यक्षा भारती शिंपी व संस्थेचे सचिव लक्ष्मीकांत बोरसे, संस्थेच्या ज्येष्ठ सदस्य लताबाई हिम्मतराव जगदाळे, पितांबर बोरसे, सुधाकर शिंपी, हिम्मतराव शिंपी यांच्या मार्फत देणगी दात्यांच्या यथोचित शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आलेल्या सर्व मान्यवरांना संबोधित करत युवराज खैरनार यांनी संत नामदेव महाराजांच्या कार्याला उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले. सदरील कार्यक्रम पार पडल्यानंतर संत नामदेव

महाराजांच्या पालखीचे भव्य शोभायात्रा व मिरवणूक मंगल भवनातून सुरुवात करून शहराचे मुख्य रस्त्यावरून गावातीलच श्री दत्त भजनी मंडळाच्या सदस्यांनी नामदेव – तुकारामांच्या जयघोषाने भजन करत शहरवासी यांचे लक्ष वेधून घेतले.
शिंपी समाज हा दरवर्षी महाराजांच्या आठवणींना उजाळा देत भव्य दिव्य कार्यक्रम व शोभायात्रा मिरवणूक स्वयंशिस्तीत कोणत्याही प्रकारच्याअडथळा निर्माण न करता करत असतो. त्याचप्रमाणे प्रामुख्याने पोलीस प्रशासन देखील आपली जबाबदारी व बंदोबस्त चोखपणे पार पाडत असते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव लक्ष्मीकांत बोरसे यांनी केले. व आलेल्या सर्व समाज बांधवांचे आभार रुपेश दगडू शिंपी यांनी मानले. कार्यक्रमानंतर स्नेह भोजनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम विशेष यशस्वितेसाठी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव ,सदस्य तसेच समाजातील सर्व तरुण मित्रांनी मोलाचे परिश्रम घेतले.









