मायेने भरलेला कळस म्हणजे आई! मायेचा विसावा देणारी सावली म्हणजे आई! नंदुरबार येथे कमलबाई मराठे यांच्या शतकपूर्ती निमित्त एक दिवशीय शिबिर संपन्न कमलबाई शामराव मराठे यांचा “शतकपूर्ती” सोहळा निमित्त परिवर्तन चळवळ पदाधिकारी यांचे एक दिवसीय शिबीर बेमोसमी वादळी पावसाचा तडाखा; मालदा येथे कापणीला आलेल्या पिकाना फटका, पत्रे उडाले, झाडे उन्मळली. तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गाळ्यांचे भूमिपूजन संपन्न!सभापती तथा आमदार राजेश पाडवी व उपसभापती अमोल भारती यांच्या शुभहस्ते भूमिपूजन महावितरनाच्या हलगर्जीपणा मुळे मोड येथील शेतकऱ्यांना लाखोचा फटका, 9 एकर ऊस जळून खाक. शहादाऔषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिवस उत्साहात.

तळवे ता.तळोदा येथील अरुण साळुंखे यांना अयोध्या येथे राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार प्रदान.

तळोदा :(तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे मो.9689840855)तालुक्यातील तळवे येथील रक्तदाता व सामाजिक कार्यकर्ते अरुण शांतीलाल साळुंखे यांना प्रभू श्रीरामाच्या पावन नगरी अयोध्या धाम येथे राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राम कृष्ण सेवा फाउंडेशन, अयोध्या आयोजित चतुर्थ राष्ट्रीय रक्तदान महोत्सव व राष्ट्रीय सेवा रत्न सन्मान समारोह – 2026 मध्ये देशभरातून आलेल्या मान्यवरांमधून त्यांची निवड करण्यात आली. दिनांक 13 सप्टेंबर 2026 रोजी हा भव्य सोहळा संपन्न झाला.श्री. अरुण साळुंखे हे सन 2017 पासून गेल्या 9 वर्षांपासून अविरतपणे रक्तदान सेवा व जनजागृतीचे कार्य करत आहेत.त्यांनी रक्त लागणाऱ्या गरजू रुग्णां साठी छत्रपती ब्लड फाऊंडेशन नावाचा वॉट्सअप ग्रुप तयार केला त्या अनुषंगाने रुग्णांना रक्तदाता शोधायला मदत होते .व गरजूंना वेळेवर मदत होत असते.त्यांचे कार्य इतके महान. आहे की ते कधी गरजू रुग्णां मधे भेदभाव ठेवत नाही.त्यांना ज्या वेळेस फोन आला त्या वेळी ते तत्पर असतात.त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे शेकडो गरजू रुग्णांचे प्राण वाचले आहेत. मेजर ध्यानचंद खेल उत्थान समिती, उ.प्र. यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या पुरस्कारामुळे तळवे, तळोदा तसेच संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

error: Content is protected !!