
तळोदा:(तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे मो.9689840855)दि.17/09/2026 रोजी खरवड – तर्हावद परिसरात रात्री 10.30 वा.वनपरिक्षेत्र अधिकारी तळोदा तसेच वनक्षेत्र स्टाफ गस्त करत असताना एक संशयास्पद वाहन दिसल्याने सदरचे वाहन क्र. MH 46 AF 1404 थांबवले असता त्यात ताज्या तोडीचा विनापास पंचरास जळाऊ अवैध माल आढळून आला. त्यानुसार पुढील तपास केला असता सदर वाहन जुवानी परिसरातून आणल्याचे सदर चालकाने सांगितले. त्यानंतर थोड्या वेळाने काही अंतरावर ताडपत्रीने बंदिस्त केलेले आयशर वाहन क्र. GJ 06 AV 9319 हे वाहन आले असता सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात पंचरास अवैध विनापास जळाऊ लाकडाचा माल आढळून आला. सदर चालकाकडे चौकशी केली असता सदर लाकडे ही प्रकाशा येथे नेणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यानुसार प्रकाशा येथील रस्त्यावरील जे.के.पॅकेजिंग ,प्रकाशा येथे डेपोत पाहणी केली असता तेथे दोन वाहनात आयशर क्र.MH 18 BG1457 आणि आयशर क्र. MH 18 BG 8049 यात पंचरास जळाऊ माल विनापासी विनापरवाना आढळून आला. सदरची वाहने ही ताब्यात घेऊन रात्री उशिरा तळोदा वन आगार येथे जप्त करून भारतीय वन अधिनियम ,1927 नुसार विविध कलमानुसार कारवाई करण्यात आली आणि पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई ही , मा.नीनु सोमराज ,वनसंरक्षक वनवृत्त धुळे, मा.संतोष सस्ते, उपवनसंरक्षक मेवासी वनविभाग तळोदा, मा.राजेंद्र सदगीर , विभागीय वनाधिकारी दक्षता वनवृत्त धुळे ,मा
अमोल आडे, सहाय्यक वनसंरक्षक, तळोदा यांचे मार्गदर्शनाखाली आणि शंतनु सोनवणे वनपरिक्षेत्र अधिकारी तळोदा (प्रा) यांचे नेतृत्वाखाली वनक्षेत्र तळोदा स्टाफ यांनी पार पाडली
वनविभागातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की वन जमिनीवर व मालकी क्षेत्रावर कुठेही अवैध वृक्षतोड आढळून आल्यास तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा









