मायेने भरलेला कळस म्हणजे आई! मायेचा विसावा देणारी सावली म्हणजे आई! नंदुरबार येथे कमलबाई मराठे यांच्या शतकपूर्ती निमित्त एक दिवशीय शिबिर संपन्न कमलबाई शामराव मराठे यांचा “शतकपूर्ती” सोहळा निमित्त परिवर्तन चळवळ पदाधिकारी यांचे एक दिवसीय शिबीर बेमोसमी वादळी पावसाचा तडाखा; मालदा येथे कापणीला आलेल्या पिकाना फटका, पत्रे उडाले, झाडे उन्मळली. तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गाळ्यांचे भूमिपूजन संपन्न!सभापती तथा आमदार राजेश पाडवी व उपसभापती अमोल भारती यांच्या शुभहस्ते भूमिपूजन महावितरनाच्या हलगर्जीपणा मुळे मोड येथील शेतकऱ्यांना लाखोचा फटका, 9 एकर ऊस जळून खाक. शहादाऔषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिवस उत्साहात.

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या दीड दिवसाच्या गणरायाला शहनाईचा सुरात, फुलांची उधळण करीत गुलाल विरहित निरोप.

तळोदा* : (तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे मो.9689840855)तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे दीड दिवसाच्या गणरायाची स्थापना करून मंगळवारी (ता. १५) पारंपरिक शहनाईचा सुरेख सुरात फुलांची उधळण करून, गुलाल विरहित विसर्जन मिरवणूक काढून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी व पत्रकार यांनी बाप्पाचे दर्शन घेतले.

नाशिक विभागीय आदर्श पत्रकार संघ पुरस्कार प्राप्त येथील तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी सोमवारी (ता. १४) दीड दिवसाच्या गणरायाची विधिवत स्थापना केली होती. आज दुसऱ्या दिवशी मंगळवारी पत्रकार संघाने पर्यावरणपूरक विसर्जन मिरवणूक काढत गणरायाला निरोप दिला. यावेळी नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, माजी मंत्री पद्माकर वळवी, नगरसेवक शिरीष माळी, नगरसेवक कपिल कर्णकार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष योगेश चौधरी, भाजपचे शहराध्यक्ष गौरव वाणी, माजी नगरसेवक सुभाष चौधरी, काँग्रेसचे शहराध्यक्ष बापू कलाल, सुरज माळी, योगेश पाडवी, अनिल पवार, शैलेंद्र अहिरे, विलास लोखंडे, विपुल कुलकर्णी, भूषण सोनार, श्याम सोनगडवाला, सुशील सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

विसर्जन मिरवणूक यशस्वी होण्यासाठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील सूर्यवंशी, अध्यक्ष सुधाकर मराठे, उपाध्यक्ष भरत चौधरी, सचिव सम्राट महाजन, ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी, वसंत मराठे, किरण पाटील, नरेश चौधरी, हेमंत मराठे, ईश्वर मराठे,महेंद्र लोहार, कैलास पाडवी, वैभव कर्णकार, राकेश पवार, मानसिंग राजपूत, आदींनी परिश्रम घेतले.

*मिरवणुकीने वेधले लक्ष*

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघ गेल्या अनेक वर्षापासून दीड दिवसाच्या गणपतीची स्थापना करीत आहे. यंदा पत्रकार संघाकडून बाप्पाला निरोप देण्यासाठी स्मारक चौकापासून दत्त मंदिर पर्यंत पारंपरिक शहनाई वाद्याचा सुरात, गुलाल ऐवजी फुलांची उधळण करीत पालखीतून बाप्पाची मिरवणूक काढली. उत्साहात मात्र तितक्याच शांततेत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

Leave a Comment

और पढ़ें

error: Content is protected !!