मायेने भरलेला कळस म्हणजे आई! मायेचा विसावा देणारी सावली म्हणजे आई! नंदुरबार येथे कमलबाई मराठे यांच्या शतकपूर्ती निमित्त एक दिवशीय शिबिर संपन्न कमलबाई शामराव मराठे यांचा “शतकपूर्ती” सोहळा निमित्त परिवर्तन चळवळ पदाधिकारी यांचे एक दिवसीय शिबीर बेमोसमी वादळी पावसाचा तडाखा; मालदा येथे कापणीला आलेल्या पिकाना फटका, पत्रे उडाले, झाडे उन्मळली. तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गाळ्यांचे भूमिपूजन संपन्न!सभापती तथा आमदार राजेश पाडवी व उपसभापती अमोल भारती यांच्या शुभहस्ते भूमिपूजन महावितरनाच्या हलगर्जीपणा मुळे मोड येथील शेतकऱ्यांना लाखोचा फटका, 9 एकर ऊस जळून खाक. शहादाऔषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिवस उत्साहात.

मानाचा श्री काका  गणेश मंडळातर्फे आयोजीत रक्तदान शिबिरात ११६ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

तळोदा :(तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे मो.9689840855)तळोदा येथील ६६  वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या तसेच महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धा महागणेशोत्सव-२०२६ जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त श्री काका गणेश मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला भर पावसात देखील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल ११६ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. विशेष म्हणजे यात ८२ युवक व पुरूष आणि ३४ महिलांनी देखील रक्तदान केले.

तसेच श्री काका गणेश मंडळाच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.  त्यात वृद्धाश्रम येथे अन्नदान, शालेय शैक्षणिक विद्यार्थांना साहित्याचे वाटप, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, शेताकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन, आनंद मेळावा, परिसरातील गढीची स्वच्छता आणि निर्माल्य संकलन अभियान, यांसारखे विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. त्यामुळे मंडळाने गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता वर्षभर सामाजिक कार्याची परंपरा निर्माण केली आहे.

रक्त संकलनाचे काम धुळे येथील श्री नवजीवन रक्त केंद्र आणि नंदुरबार येथील जनकल्याण रक्त केंद्र चे आकाश जैन यांच्या पथकाने केले. डॉ. सुनील चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली टेक्निशियन दिलीप जाधव, प्रवीण महाजन, समुपदेशक विशाल साळुंखे व अटेंडंट पांडुरंग गवळी यांनी रक्तसंकलनाची जबाबदारी पार पाडली.

रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष किरण राणे,उपाध्यक्ष सुनील चव्हाण, सचिव संजय शेंडे, यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व युवक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. रक्तदानासाठी नागरिकांनी दाखविलेला उत्स्फूर्त सहभाग हा मंडळाच्या सामाजिक कार्याला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद ठरला.

 

भर पावसात देखील ११६ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग; सामाजिक बांधिलकीची ६६ वर्षांची परंपरा कायम.ठेवत एकाच कुटुंबातील बहुतांश लोकांनी सुद्धा रक्तदान केले.

Leave a Comment

और पढ़ें

error: Content is protected !!