मायेने भरलेला कळस म्हणजे आई! मायेचा विसावा देणारी सावली म्हणजे आई! नंदुरबार येथे कमलबाई मराठे यांच्या शतकपूर्ती निमित्त एक दिवशीय शिबिर संपन्न कमलबाई शामराव मराठे यांचा “शतकपूर्ती” सोहळा निमित्त परिवर्तन चळवळ पदाधिकारी यांचे एक दिवसीय शिबीर बेमोसमी वादळी पावसाचा तडाखा; मालदा येथे कापणीला आलेल्या पिकाना फटका, पत्रे उडाले, झाडे उन्मळली. तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गाळ्यांचे भूमिपूजन संपन्न!सभापती तथा आमदार राजेश पाडवी व उपसभापती अमोल भारती यांच्या शुभहस्ते भूमिपूजन महावितरनाच्या हलगर्जीपणा मुळे मोड येथील शेतकऱ्यांना लाखोचा फटका, 9 एकर ऊस जळून खाक. शहादाऔषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिवस उत्साहात.

जी.डी.आर.कन्या विद्यालय तळोदा येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी

तळोदा* :- दि.८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत तळोदा येथील गुलाबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी वैद्यकीय पथकाने विद्यार्थिनींची विविध आरोग्यविषयक तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले व संदर्भ सेवची विस्तुत माहिती दिली.
या आरोग्य तपासणी मोहिमेत डॉ. वंदना पाटील, वैद्यकीय अधिकारी, डॉ. सैय्यद अरसालान , वैद्यकीय अधिकारी, दिगंबर मराठे, फार्मासिस्ट, आक्का पावरा, परिचारिका आदींच्या पथकाने विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी केली.

विद्यालयाचे मुख्याध्यापक मिलिंद धोदरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपक्रम पार पडला. विद्यार्थिनींच्या आरोग्याची नियमित तपासणी होणे, आरोग्यविषयक समस्या वेळीच निदर्शनास आणून त्यावर योग्य उपचार व मार्गदर्शन मिळणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.

या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक मिलिंद धोदरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक दिलीप तडवी, योगेश पाटील,साहेबराव पाटील, वैशाली देवरे, भाग्यश्री सागर, हितेश वाघ, दिनेश मराठी, ज्योती महाजन, उल्हास मगरे, सचेत शेंडे, अनिल मगरे, हिरालाल पाडवी, धनराज केदार, सुदाम यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Leave a Comment

और पढ़ें

error: Content is protected !!