मायेने भरलेला कळस म्हणजे आई! मायेचा विसावा देणारी सावली म्हणजे आई! नंदुरबार येथे कमलबाई मराठे यांच्या शतकपूर्ती निमित्त एक दिवशीय शिबिर संपन्न कमलबाई शामराव मराठे यांचा “शतकपूर्ती” सोहळा निमित्त परिवर्तन चळवळ पदाधिकारी यांचे एक दिवसीय शिबीर बेमोसमी वादळी पावसाचा तडाखा; मालदा येथे कापणीला आलेल्या पिकाना फटका, पत्रे उडाले, झाडे उन्मळली. तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गाळ्यांचे भूमिपूजन संपन्न!सभापती तथा आमदार राजेश पाडवी व उपसभापती अमोल भारती यांच्या शुभहस्ते भूमिपूजन महावितरनाच्या हलगर्जीपणा मुळे मोड येथील शेतकऱ्यांना लाखोचा फटका, 9 एकर ऊस जळून खाक. शहादाऔषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिवस उत्साहात.

शिक्षक दिनाचे औचित्य साधत न्यू . हायस्कूल व श्री.शी.ल.माळी कनिष्ठ महाविद्यालय तळोदा येथील विद्यार्थ्यांनी सांभाळला एक दिवसाचा कार्यभार!

तळोदा 🙁 तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे मो.9689840855)वर्गात शिकवताना शिक्षकांना किती परिश्रम घ्यावे लागतात, शिकविला जाणाऱ्या त्या-त्या विषयांची कशी तयारी करावी लागते याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी. तसेच त्यांचा सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी येथील प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन न्यू हायस्कुल व श्री शि. ल. माळी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक व शिपाई यांच्या जबाबदाऱ्या पार पाडत एक दिवस शाळेचा कारभार सांभाळला.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून येथील प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन न्यू हायस्कुल व श्री शि. ल. माळी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी प्राचार्यपासून ते शिपायापर्यंतची सर्व जबाबदारी विद्यार्थ्यांनी पार पाडली. प्रत्येक वर्गात जाऊन शिक्षकांप्रमाणे विद्यार्थ्यांनी शिकवले. नेहमीप्रमाणे वर्गात तास घेण्यात आले. यावेळी प्राचार्य व पर्यवेक्षकांची जबाबदारी सांभाळणाऱ्या विद्यार्थ्यांनी तासिका व्यवस्थित होण्याबरोबरच शाळेत शिस्त राहील व दैनंदिनीनुसार शाळा चालेल याकडे लक्ष दिले. शिपाई झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळेतील साफसफाई सोबतच विविध कामे केलीत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमरदीप महाजन, इंग्लिश विभाग प्रमुख डॉ. शितल महाजन, उपमुख्याध्यापक सुनील सूर्यवंशी, पर्यवेक्षक पंडित वळवी, पर्यवेक्षक अंबरीश सूर्यवंशी आदींनी वर्गात जाऊन निरीक्षण केले.

यावेळी आकांक्षा पाटील प्राचार्य, लता सोनवणे उपमुख्याध्यापक, तन्वी सूर्यवंशी व केतन मोहने पर्यवेक्षक झाले होते. तसेच दर्शिका माळी, सलोनी मगरे, साधना बच्छाव, मुस्कान वसावे, नयना भोई, विद्या पवार, गायत्री गागरे, भक्ती पाटील, करीना वळवी, समीक्षा पावरा, हिमाशु सूर्यवंशी, सुजल ओतारी, भूषण कुंभार, तेजस मराठे, आदित्य साळुंखे, कुणाल वसावे, लीना सागर, जान्हवी शिंपी, असबा पठाण, नैतिक खाटिक, वैष्णवी वानखेडे, दीक्षिता पाटील, पीयुष पाडवी, मानसी गुरव, रिधिमा पाडवी, टीना वळवी, रोशनी सोनवणे आदींनी शिक्षक, शिक्षिका व शिपाई यांची भूमिका पार पाडली. या उपक्रमाचे संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई महाजन, आधारस्तंभ तथा कॉलेज ट्रस्टचे संचालक अरुणकुमार महाजन व सर्व संचालक मंडळाने कौतुक केले. उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

एका दिवसासाठी पर्यवेक्षक पदाची जबाबदारी सांभाळताना अनेक आव्हाने आलीत. अनेकदा टेन्शन आले तर अनेक गमती-जमतीचे प्रसंग देखील घडले. प्राचार्य, पर्यवेक्षक सोबतच शिक्षक, शिक्षिका व शिपाई यांना आपापली जबाबदारी पार पाडताना रोज किती परिश्रम घ्यावे लागतात याचा अनुभव देखील यावेळी आला.
: तन्वी सूर्यवंशी
पर्यवेक्षक-विद्यार्थिनी.

Leave a Comment

और पढ़ें

error: Content is protected !!