मायेने भरलेला कळस म्हणजे आई! मायेचा विसावा देणारी सावली म्हणजे आई! नंदुरबार येथे कमलबाई मराठे यांच्या शतकपूर्ती निमित्त एक दिवशीय शिबिर संपन्न कमलबाई शामराव मराठे यांचा “शतकपूर्ती” सोहळा निमित्त परिवर्तन चळवळ पदाधिकारी यांचे एक दिवसीय शिबीर बेमोसमी वादळी पावसाचा तडाखा; मालदा येथे कापणीला आलेल्या पिकाना फटका, पत्रे उडाले, झाडे उन्मळली. तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गाळ्यांचे भूमिपूजन संपन्न!सभापती तथा आमदार राजेश पाडवी व उपसभापती अमोल भारती यांच्या शुभहस्ते भूमिपूजन महावितरनाच्या हलगर्जीपणा मुळे मोड येथील शेतकऱ्यांना लाखोचा फटका, 9 एकर ऊस जळून खाक. शहादाऔषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिवस उत्साहात.

आपल्या मनाला शांती आणि समाधान देणारे सर्वात मोठे साधन म्हणजे भक्ती महात्म्य-प्रा. भगवान चिने

तळोदा– ( तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे मो.9689840855)भक्ती म्हणजे देवावर श्रद्धा ठेवणे असून संतांच्या मार्गावर चालत राहिल्याने हरिपाठ किंवा देवाच्या नावाच्या स्मरणाने माणूस संकटातून बाहेर पडत असतो. भक्ती केल्याने मनातील अहंकार आणि ताणतणाव नष्ट होत असतात. आपल्या मनाला शांती आणि समाधान देणारे सर्वात मोठे साधन म्हणजे भक्ती महात्म्य होय असे प्रप्तीपादन सेवानिवृत्त प्रा. भगवान चिने यांनी केले.
ते तळोदा येथील इंद्रप्रस्थनगरचा राजा गणेश मंडळाच्या आयोजित केलेल्या भक्ती महात्म्य कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रा. चिने यांनी नगरातील महिला भगिनींकडून दररोज हरिपाठ करण्यात येत असल्याचे कौतुक करीत श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन अर्चन, वंदन, दास्य सख्य आणि आत्मनिवेदन असे भक्तीचे नऊ प्रकार सांगत ती केल्याने आपण नम्र बनतो आणि सर्वांवर प्रेम करायला शिकतो असे सांगत महायज्ञ, नामसंकीर्तन यज्ञ कलियुगामध्ये ईश्वरच्या प्राप्तीसाठी मनाच्या शुद्धीसाठी आणि सर्व पापांच्या नाशासाठी एकत्रितपणे किंवा वैयक्तिकरित्या भगवंतांचा नावाचा जयघोष,जप म्हणजेच कीर्तन असून आपल्या हिंदू धर्म शास्त्रांमध्ये आणि संतांच्या साहित्यात या साधनेला सर्वात मोठे प्रभावी मानले गेले आहे असे सांगितले. भक्तीमध्ये एवढी ताकद आहे की प्रत्यक्ष भगवंतही भक्ताचा ऋणी बनतो. तुकोबा म्हणतात,”भक्तीचिया पोटी प्रगटे नारायण”, असे सांगत ईश्वराला सोन्या नाण्याची, छप्पन भोगाची, कर्म कांडाची गरज नसते.त्याला गरज असते ती फक्त एका खऱ्या, निष्कपट आणि प्रेमळ अंतकरणाची असे सांगत आपल्या आसपासच्या मूकप्राणी पशुपक्षी यांच्याबद्दल मनात आदर, सहानुभूती बाळगा तसेच त्यांना पाण्याची,अन्नदानाची सोय करा असेही यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी नगर तसेच परिसरातील नागरिक, महिला शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष निंबा पाटील, उपाध्यक्ष संजय पटेल, सचिव पंकज वानखेडेसह नगरातील नगरवासीयांनी मेहनत घेतली.

Leave a Comment

और पढ़ें

error: Content is protected !!