शहादा – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संचलित आदिवासी अकादमी, नंदुरबार व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मोलगी जि.नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने पहिला टप्प्यातील जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयाचे नावलौकिक करून यश संपादन केले. आविष्कार २०२५ या स्पर्धेत महाविद्यालयातर्फे पोस्टर सादरीकरण पदवी श्रेणीत १० आणि पदव्युत्तर पदवी श्रेणीत १५ तसेच मॉडेल्स (उपकरण) पदवी श्रेणीत ०३ असे एकूण ५६ स्पर्धकांनी सादर आपले पोस्टर आणि मॉडेल्स (उपकरण) यांचे सादरीकरण केले. त्यातील आविष्कार २०२५ च्या दुसऱ्या टप्प्यातील विद्यापीठ स्तरीय स्पर्धेसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे महाविद्यालयातील १० स्पर्धकांची निवड करण्यात आली होती त्यात पोस्टर सादरीकरण पदवी श्रेणीत ०४ स्पर्धक त्यात पाटील नेहा प्रकाश, पाटील माधुरी शरद, पाटील किरण दिलीप, वाघ उदय कैलास, तसेच मॉडेल्स (उपकरण) मध्ये ०२ स्पर्धक त्यात गिरासे गणेश दिपक, पाटील प्रेमसागर दिलीप तर पदव्युत्तर पदवी श्रेणीत पोस्टर सादरीकरणमध्ये ०४ स्पर्धक त्यात ठाकरे पूजा मनोहर, बोरसे रविशा सतीश, कुवर प्रवीण जगतसिंग, पाटील हितेश विनोद यांची विद्यापीठस्तरीय आविष्कारच्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून पहिली फेरी पूर्ण केली व त्यात पदवी श्रेणीत ०२ स्पर्धक त्यात पाटील किरण दिलीप, वाघ उदय कैलास, तसेच मॉडेल्स (उपकरण) मध्ये ०२ स्पर्धक त्यात गिरासे गणेश दिपक, पाटील प्रेमसागर दिलीप तर पदव्युत्तर पदवी श्रेणीत पोस्टर सादरीकरणमध्ये ०२ स्पर्धक त्यात ठाकरे पूजा मनोहर, बोरसे रविशा सतीश यांची दुसऱ्या फेरीसाठी निवड करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या फेरीत पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन (पीपीटी) मध्ये औषधनिर्माणशास्त्र (मेडिसिन व फार्मसी) विभागाच्या पदवी गटातून पाटील किरण दिलीप, वाघ उदय कैलास या विद्यार्थ्यांनी “फॉर्म्युलेशन ऑफ हर्बल हेअर ऑइल” ह्या घटकावर संशोधन केले आहे व दुसऱ्या फेरीत त्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन (पीपीटी) सादरीकरण केले व त्यात त्यांची विद्यापीठात औषधनिर्माणशास्त्र (मेडिसिन व फार्मसी) विभागाच्या पदवी गटातून तृतीय क्रमांक मिळवून राज्य स्तरावर निवड करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी संस्थेचे व महाविद्यालयाचे नावलौकिक केले आहे. येत्या २८ ते ३० जानेवारी २०२५ दरम्यान परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे औषधनिर्माणशास्त्र विभागाच्या पदवी गटातून विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. त्याठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून राज्यस्तरीय आविष्कारसाठी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयातील प्रा.दिवाकर पाटील यांनी मार्गदर्शन केले. सदर विद्यार्थीनीची राज्यपातळीवर निवड झाली असून त्यांचे सर्वत्र कौतुक अभिनंदन केले जात आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक प्राध्यापक व प्राध्यापकांचे पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष श्री जगदीशभाई पाटील, मानद सचिव ताईसाहेब श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा मंडळाचे संचालक श्री मयूरभाई दीपकभाई पाटील, प्राचार्य डॉ. एस.पी. पवार यांनी सर्व सहभागी आणि निवडलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे कौतुक व अभिनंदन केले. विद्यार्थी स्पर्धकांना आविष्कार समिती प्रमुख व समन्वयक प्रा.डॉ. सुनीला पाटील, आविष्कार संघ प्रमुख प्रा.अमित धनकानी आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांचे मार्गदर्शन लाभले.









